मुंबईच्या समुद्रातील प्लॅस्टिकमुळे पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नाही. यामुळे मुंबई तुंबते. या समस्येकडे गांभीर्याने बघायला हवे, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने शुक्रवारी नोंदवले.
मुख्य न्यायाधीश देवेंद्र पुमार उपाध्याय व न्या. मिलिंद साठये यांच्या खंडपीठाने हे गंभीर निरीक्षण नोंदवत हे प्रकरण स्युमोटो सुनावणीसाठी दाखल करून घेतले. माशांच्या पोटात हे प्लॅस्टिक जाते. समुद्रातील मासे खाणाऱ्यांच्या आरोग्यासाठीही हे धोकादायक असल्याचे मत खंडपीठाने व्यक्त केले. केंद्र व राज्य सरकारसह प्रदूषण नियामक मंडळांना भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही खंडपीठाने दिले आहेत.