रेडिओलॉजिस्टला तत्काळ कामावर घ्या – उच्च न्यायालय

परळ येथील महात्मा गांधी स्मारक रुग्णालयात रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करणाऱ्या डॉक्टरला अचानक सेवेतून मुक्त करण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालय प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. कोणत्या कारणास्तव रेडिओलॉजिस्टला कामावरून निवृत्त केले? असा सवाल करीत हायकोर्टाने रुग्णालयाला जाब विचारला. एवढेच नव्हे, तर रेडिओलॉजिस्टला ताबडतोब कामावर घ्या, असा आदेशही दिला.

1990 पासून डॉ. निमिष शहा हे रेडिओलॉजिस्ट या पदावर काम करीत आहेत. 1996 साली त्यांना विभागप्रमुख करण्यात आले. ऑगस्ट 2018 रोजी राज्य सरकारने ‘ग्रेड ए’च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे आणि जुलै 2019 रोजी 62 वर्षे केले. 19 सप्टेंबर 2019 रोजी रुग्णालयाने एक परिपत्रक जारी करून ऑगस्ट 2019 मधील ‘जीआर’ची अंमलबजावणी केली. ज्येष्ठ डॉक्टरांची सेवा वाढविण्यासंदर्भात बोर्डाने कोणताही निर्णय घेतला नसल्याबाबत 30 जून रोजी रुग्णालय प्रशासनाने परिपत्रक काढले व 58 वर्षे ओलांडलेल्या ज्येष्ठ डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना निवृत्त करण्याचा आदेश दिला. याविरोधात डॉ. शहा यांनी ऍड. अथर्व दांडेकर यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या