एलॉन मस्कच्या ‘X’ कॉर्पला उच्च न्यायालयाचा दिलासा

twitter-x-corp

मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरला (आता X कॉर्प) फेब्रुवारी 2021 ते 2022 दरम्यान एका वर्षासाठी माहिती तंत्रज्ञान (आयटी) मंत्रालयाच्या आदेशांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्याबद्दल 50 लाख रुपयांचा दंड भरण्यापासून अंतरिम सवलत देण्यात आली आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयाने गुरुवारी ही स्थगिती दिली. एकल खंडपीठाच्या आदेशाने जूनमध्ये ट्विटरवर हा दंड आकारला होता.

X कॉर्प्सने आपली सत्यता दर्शवण्यासाठी एका आठवड्याच्या आत न्यायालयात 25 लाख रुपये जमा करावेत या अटीच्या अधीन न्यायालयाने दिले आहेत.

या प्रकरणाची पढील सुनावणी 24 ऑगस्ट रोजी होणार आहे.