दुसऱ्याची पार्किंग वापरणाऱ्या सदस्याला गृहनिर्माण सोसायटी दंड आकारू शकते, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. हा दंड वसूल करण्यासाठी सोसायटीने केलेल्या अर्जावर सहाय्यक निबंधकांना सुनावणी घेण्याचे अधिकार आहेत, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
या दोन मुद्दय़ांवर आक्षेप घेत एका सोसायटी सदस्याने याचिका दाखल केली होती. दुसऱ्या सदस्याच्या पार्किंगच्या जागेत मी गाडी पार्क करत होतो. त्या सदस्याला पार्किंग चार्जेस आकारले. मला पार्किंगचा दंड आकारण्यात आला आहे. सोसायटी केवळ पार्किंगच्या एनओसीसाठी पैसे आकारू शकते, असा दावा या सदस्याने केला होता. या सर्व मुद्दय़ांवर सुनावणी घेण्याचे आदेश न्या. मिलिंद जाधव यांनी सहाय्यक निबंधकांना दिले आहेत.