कोल्हापूरमध्ये खंडपीठ झालेच पाहिजे!

11

सामना ऑनलाईन । नागपूर

गेल्या २५ वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे अशी नागरिकांची मागणी आहे. पण याकडे सरकार दुर्लक्ष करीत आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिवसेनेच्या आमदारांनी आंदोलन केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिह्यांकरिता कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे स्थापन व्हावे अशी मागणी सहा जिह्यांतील नागरिक करीत आहे.

काही लोकांनी हे खंडपीठ पुणे येथे पळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू असा इशारा शिवसेना आमदारांनी दिला. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम्ही लक्षवेधीच्या माध्यमातून विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. तरी शासनाने त्वरित खंडपीठ स्थापन करण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी आमदारांनी केली. या आंदोलनात डॉ. सुजित मिणचेकर, ज्ञानराज चौगुले, चंद्रदीप नरके, अजय चौधरी आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या