बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा बिझनेसमन पती राज कुंद्राला बंगला व फार्महाऊस रिकामे करण्यासाठी नोटीस पाठवणारी केंद्रीय तपास यंत्रणा ईडी गुरुवारी उच्च न्यायालयात तोंडघशी पडली. दाम्पत्याविरुद्ध बजावलेल्या नोटिसीला अनुसरून तूर्तास कुठलीही कारवाई करणार नाही, अशी हमी ईडीने दिली. त्याची दखल घेतानाच न्यायालयानेही दाम्पत्याला कारवाईपासून अंतरिम संरक्षण दिले. ईडीने बिटकॉइन फसवणुकीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात शिल्पा शेट्टी व राज कुंद्राला 27 सप्टेंबरला नोटीस बजावली. दोघांना जुहूतील बंगला आणि पुणे-पवना येथील फार्महाऊस दहा दिवसांत रिकामे करण्यास सांगितले होते.