‘या’ कारणामुळे कमी झाले चीनमधील कोरोनाचे संक्रमण!

7830

जगभरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असतानाच चीनमध्ये कमी होणारे संक्रमण दिसाला देणारे आहे. चीनच्या वूहान शहरातून कोरोनाचे संक्रमण जगभरात पसरले होते. आता त्याच वूहान शहरातील जनजीवन पूर्वपदावर येत आहे. वूहान शहरात आणि चीनमध्ये गेल्या तीन दिवसात कोरोनाचे नवे संक्रमित रुग्ण आढळले नाहीत. चीनमध्ये झपाट्याने पसरणारे कोरोनाचे संक्रमण अचानक कमी कसे झाले, याबाबत संशोधन करण्यात आले. त्यातून संक्रमण कमी होण्याचे कारण उघड होत आहे.

वाढते तापमान आणि वातावरणातील दमटपणामुळे कोरोनाच्या फैलावाला आळा बसत असल्याचे उघड झाले आहे. उष्ण वातावरण या विषाणूंना नष्ट करू शकत नाही. मात्र, उष्ण आणि दमट वातावरणाने कोरोनाच्या प्रसाराला नक्कीच आळा बसतो, असे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. बेइहांग आणि सिंघुगा विद्यापीठाने चीनमध्ये तापमान वाढलेल्या 100 शहरांचा अभ्यास केला. त्यातून हे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे चीनमधील तापमान बदलताच चीनमध्ये कोरोनाचा फैलाव कमी झाला आहे.

चीनमधील तापमान बदलल्यानंतर 100 शहरात उष्णता वाढलेल्या शहरांचा अभ्यास करण्यात आला. तापमान वाढल्यानंतर संक्रमित झालेल्या व्यक्तींची संख्या 2.5 वरून 1.5 टक्क्यांपर्यंत कमी झाली. चीनमध्ये डिसेंबर महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जगभरात असलेल्या थंड वातावरणामुळे कोरोनाचा झपाट्याने फैलाव झाला. चीनमध्ये फेब्रुवारीला कमी तापमान असल्याने एकाच दिवसात कोरोनाचे 15 हजार रुग्ण आढळले होते. जगभारत थंडीचे वातावरण असलेल्या देशातही याचा झपाट्याने फैलाव झाला. इटली आणि अमेरिकेतही थंडी असल्याने या देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. उष्ण तापमानात कोरोनाचे विषाणू तग धरू शकणार नाही, असे मत काही संशोधकांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यावर एकमत झाले नव्हते. आता चीनमध्ये तापमान वाढलेल्या शहरांचा अभ्यास आणि तेथे संक्रमणाची घटलेली संख्या यावरून तरी उष्ण आणि दमट हवामानात कोरोनाचे संक्रमण कमी होते, असे दिसून येत आहे. त्यामुळे कोरोनाचा झपाट्याने फैलाव होत असलेल्या देशात तापमान वाढल्यावर आणि दमट हवामा झाल्यावर कोरोनाच्या संक्रमणाला आळा बसण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या