समुद्राच्या उधाणामुळे संरक्षक भिंत कोसळली, विजेचाही लपंडाव

25
देवबाग किनारपट्टीवर लाटांच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेली संरक्षक भिंत

सामना प्रतिनिधी । मालवण

किनारपट्टीवर वाऱ्याचा जोर वाढल्याने समुद्राला उधाण आले आहे. सुमद्राला आलेल्या उधाणाचा फटका किनारपट्टी लगतच्या भागाला बसत आहे. मंगळवारी उधाणासह जोरदार लाटांचा तडाखा देवबाग किनारपट्टीला बसला. काही घरांना समुद्राच्या पाण्याने वेढा दिला. किनारपट्टीच्या बाजूने असलेली संरक्षक लाटांच्या तडाख्यात कोसळून जमिनदोस्त झाली.

दरम्यान, तालुक्यातील आचरा डोंगरेवाडी येथील मधुकर बागवे यांच्या मांगरावर झाड कोसळून सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले. कोकण किनारपट्टीवर समुद्री लाटांचा जोर वाढला आहे. गेले दोन दिवस लाटांच्या माऱ्यामुळे सिंधुदुर्गातील मालवण, देवबागसह अन्य किनारपट्टीवरील गावे हादरुन गेली आहेत. समुद्राच्या लाटा काही ठिकाणी बंधाऱ्यावरून घरालगत घुसल्याचे चित्र होते. दिवसभरात मालवण तालुक्यात २३ मिलिमीटर, तर आतापर्यंत एकूण ६६० मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.

आचरे येथे मागरावर झाड पडून नुकसान झाले
आचरे येथे मागरावर झाड पडून नुकसान झाले

गेले काही दिवसांपासून तालुक्यात सुरू असलेला वीजेचा खेळखंडोबा मंगळवारीही चालुच होता. काही ठिकाणी झाडे पडून वीज पुरवठा खंडित झाला होता, तर काही वेळा वीज पुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा खंडित झाल्याचे चित्र होते.

आपली प्रतिक्रिया द्या