आयपीएलमधील खास क्लबमध्ये विलियम्सनचा समावेश, डिव्हिलिअर्सला धोबीपछाड

48

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएल २०१८ चा शेवटचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघामध्ये मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरू आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाताना हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनच्या नावावर नवा विक्रम जमा झाला आहे. फायनलमध्ये १२ वी धाव घेताच त्याने दक्षिण आफ्रिकन खेळाडू एबी डिव्हिलिअर्सला धोबीपछाड दिला.

आयपीएलमधील ऑरेंज कॅपधारक हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन यंदाच्या सत्रात चांगलाच फॉर्मात आहे. चेन्नईविरुद्ध खेळताना विलियम्सनने ७०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलमध्ये एकाच सत्रात ७०० धावा ठोकण्याच्या यादीत पाचव्या स्थानावर आला आहे. डिव्लिलिर्सच्या सहाव्या स्थानावर असून त्याच्या नावावर ६८७ धावांची नोंद आहे.

आयपीएलमध्ये एकाच सत्रात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू

विराट कोहली – ९७३ धावा (वर्ष २०१६)
डेव्हिड वॉर्नर – ८४८ धावा (वर्ष २०१६)
मायकल हसी -७३३ धावा (वर्ष २०१३)
ख्रिस गेल – ७०८ आणि ७३३ धावा (वर्ष २०१३ व २०१२)
केन विलियम्सन* ७२२ (वर्ष २०१८)

आपली प्रतिक्रिया द्या