धक्कादायक! देशात गेल्या 24 तासात 7466 कोरोनाग्रस्त आढळले, आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ

692
फोटो- प्रातिनिधीक

देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असून गेल्या 24 तासात देशात 7466 रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची रुग्णांच्या संख्येतली एका दिवसातली सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,65,799 वर पोहोचला आहे. देशात सध्या 89987अॅक्टिव्ह रुग्ण असून 71105 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

गेल्या 24 तासात 175 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4706 वर पोहोचली आहे. मृतांमध्ये सर्वाधिक 1982 मृत्यू महाराष्ट्रात तर त्याखालोखाल गुजरातमध्ये 960, तामिळनाडूत 145, तेलंगाणात 67, आंध्र प्रदेशमध्ये 59, कर्नाटकात ४७, पंजाब ४०, जम्मू कश्मीर 27, हरयाणा 19, बिहार १५ जणांचा मृत्यू झाला आहे. ,

आपली प्रतिक्रिया द्या