सलग दुसऱ्या दिवशी रुग्णसंख्येत मोठी वाढ, 24 तासात कोरोनाग्रस्तांची संख्या 7964 ने वाढली

1675

देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 7964 रुग्ण आढळले आहेत. ही आतापर्यंतची रुग्णांच्या संख्येतली एका दिवसातली सर्वात मोठी वाढ आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,73,763 वर पोहोचला आहे. देशात सध्या 86422 अॅक्टिव्ह रुग्ण असून 82370 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.


गेल्या 24 तासात 265 जणांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंतचा एका दिवसातील मृत्यूंचा उच्चांक आहे. त्यामुळे देशातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 4971 वर पोहोचली आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत जाणारा आकडा हा चिंतेची बाब ठरत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या