वाढता वाढता वाढे… गेल्या 24 तासात देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात मोठी वाढ, वाचा आकडेवारी

1238

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात गेल्या 24 तासात मोठी वाढ झाली आहे. एका दिवसातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा आठ हजाराच्या पार गेला आहे. शनिवारी दिवसभरात देशात 8380 रुग्ण आढळले आहेत. ही वाढ चिंताजनक असून मृतांचा आकडा देखील पाच हजाराच्या पार गेला आहे.

गेल्या 24 तासात 193 जणांचा मृत्यू झाला असून देशातील 8380 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1,82,143 वर पोहोचली आहे तर आतापर्यंत 5164 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 89,995 अॅक्टिव्ह केसेस असून 86,984 रुग्ण बरे झाले आहेत.

सध्या देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात आता 65,168 रुग्ण असून 2197 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तामिळनाडूत सध्या 21,184 जण कोरोनाग्रस्त असून 160 जणांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत सध्या 18549 रुग्ण, गुजरात 16,343 रुग्ण आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या