सर्वाधिक टॅक्स भरणारे हिंदुस्थानी क्रिकेटर

28
सामना ऑनलाईन । मुंबई
क्रिकेट आणि बॉलिवूड हे हिंदुस्थानातील सर्वाधिक चर्चिले जाणारी क्षेत्रे आहेत. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड अॅक्टर्सचे अनेक चाहते हिंदुस्थानात आहेत. त्यामुळे हे क्रिकेटर्स आणि अॅक्टर्स यांची संपत्तीही तितकीच जास्त आहे. सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या यादीत या क्षेत्रातील मंडळीही सर्वात वर असतात. या यादीत सर्वात आघाडीवर कोणते क्रिकेटपटू आहेत यावर एक नजर टाकूया.
dhoni
महेंद्र सिंह धोनी
हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा माजी कर्णाधार महेंद्रसिंह धोनी या यादीत आघाडीवर आहे. धोनी पेप्सी, रिबॉक, एक्साईड, टीव्हीएस मोटर्स यासारख्या मोठ्या कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. यातून मिळणारी त्याची कमाई देखील तितकीच जास्त असल्याने तो धोनी ४८ कोटी रुपये टॅक्स भरतो.
 virat-kohli_cricket_india
विराट कोहली
२०१६ पर्यंत विराट कोहली १३ ब्रँन्डचा ब्रँन्ड अॅम्बेसेडर होता. यामध्ये अॅडिडास, ऑडी, बुस्ट, कोलगेट, हर्बललाईफ, एमआरएफ, नितेश एस्टेट, पेप्सिको, स्मॅश, टिसॉट, टीव्हीएस मोटर्स या ब्रँड्सचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी कोहलीनं प्युमा कंपनीसोबत १०० कोटींचा करार केला आहे. एवढ्या उत्पन्नावर कोहली ४२ कोटी रुपये टॅक्स भरतो.
sachin
सचिन तेंडुलकर
क्रिकेटमधील अनेक रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. क्रिकेटमधील त्यांच योगदानही तितकचं मोठं आहे. सचिन अनेक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. त्यामुळं सचिनचं उत्पन्नही खूप आहे. या उत्पन्नावर सचिन १९ कोटी टॅक्स सरकारला भरतो.
आपली प्रतिक्रिया द्या