हिमाचे सहावे सुवर्ण पदक

262
hima-das-gold

धिंग एस्प्रेस हिमा दास हिची रेसिंग ट्रकवरील दमदार कामगिरी रविवारीही सुरूच राहिली. तिने झेक प्रजासत्ताक येथे झालेल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकत पुन्हा एकदा आपली धमक दाखवली. तिने 300 मीटर शर्यतीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. 2 जुलैपासून सुरू झालेल्या युरोपियन दौऱ्यातील तिचे हे सहावे सुवर्ण पदक ठरले. मुहम्मद अनासनेही 300 मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकले.

आपली प्रतिक्रिया द्या