दारूच्या बाटलीवर 10 रुपये गोमाता अधिभार!

हिमाचल प्रदेश सरकारने राज्यात दारु विक्रीवर प्रत्येक बाटलीमागे 10 रुपये गोमाता अधिभार लावण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यात अनेक घोषणांचा वर्षाव करण्यात आला. यामध्ये सर्वाधिक चर्चेत राहिली ती गोमाता अधिभार ही घोषणा. महसूल वाढवण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. या अधिभारामुळे राज्याच्या तिजोरीत वर्षाला सुमारे 100 कोटींचा महसूल जमा होणार आहे.