हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरचं आपत्कालीन लँडिंग, बिथल येथील घटना

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या हेलिकॉप्टरचं गुरुवारी रामपूरमधील बिथल येथे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं.

मुख्यमंत्र्यांसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री, थिओगचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांचे प्रेस सचिव सोबत होते.

जेएसडब्ल्यू कंपनीच्या प्रकल्पाच्या परिसरात हेलिपॅड बांधण्यात आले आहे.

मात्र, हेलिकॉप्टर नेमलेल्या ठिकाणी उतरू शकले नाही आणि सावधगिरीने 500 मीटर अंतरावर असलेल्या शेतात उतरले.

वैमानिकांच्या तत्परतेमुळे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू पूर्णपणे सुरक्षित आहेत.