… तर कोरोनाग्रस्तावर दाखल होणार हत्येचा गुन्हा, वाचा सविस्तर

2996

निजामुद्दीन येथे तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यातील काही जण नर्सवर थुंकले होते. या तबलिगींनी नर्सेस समोर नग्न जात अश्लील वर्तनही केले होते. त्यानंतर त्यांच्यावर कडक कारवाईचे आदेश दिले होते. तबलिगींना ठेवलेल्या क्वारंटाईन कक्षात सैन्याला तैनात करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे

आता हिमाचल प्रदेशमध्ये कोरोनाग्रस्त जर एखाद्या व्यक्तीच्या अंगावर थुंकला तर त्याच्याविरोधात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक एसआार मंडी यांनी ही माहिती दिली आहे. तसेच ज्या व्यक्तीवर कोरोनाग्रस्त थुंकला त्या व्यक्तीचे जर कोरोनाने निधन झाले तर त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल होणार आहे, असे मंडी यांनी सांगितले

आपली प्रतिक्रिया द्या