आसामचे 15 वे मुख्यमंत्री म्हणून हेमंत बिस्वा शर्मा यांनी घेतली शपथ

हेमंत बिस्वा शर्मा यांनी सोमवारी आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासह अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते. आसामचे राज्यपाल जगदीश मुखी यांनी शर्मा यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. आसाममध्ये सलग दुसऱ्यांदा भाजपाने सत्ता मिळवली आहे.

रविवारी उत्तर पूर्व लोकशाही आघाडीचे (एनईडीए) संयोजक हिमंता बिस्वा शर्मा यांची एकमताने भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली. शर्मा हे आधीच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. त्यावेळी सर्वानंद सोनोवाल हे राज्याचे मुख्यमंत्री होते.

हेमंत बिस्वा यांनी 2015 मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर भाजपची ताकद वाढली आणि 2016 च्या निवडणुकीत आसाममध्ये भाजपची सत्ता आली. शर्मा यांनी दुसऱ्यांदा भाजपाला सत्ता मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या