प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री हिना खान कर्करोगावर उपचार घेत आहे. तिला तिसऱ्या स्टेजचा कर्करोग असून ती धाडसाने त्याचा सामना करत आहे. दुःखातही ती आनंदी राहण्याची कारणे शोधत असते. आता तिने इंस्टाग्रामवर पारंपारिक काश्मिरी ड्रेसमधील फोटो शेअर करून नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोंमध्ये ती पारंपारिक काश्मिरी ड्रेस परिधान करताना दिसत आहे. गुलाबी कुर्ता सेट घालून हिनाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. हिनाच्या या कस्टमाइज्ड कुर्ता सेटला सोनेरी रंगाने भरतकाम केले आहे. जे नेकलाइन, चोली आणि स्लीव्सवर दिसत होते. हिनाने फुलस्लीव्स कुर्त्यासोबत मॅचिंग सलवार आणि नेटचा दुपट्टा कॅरी केला आहे, ज्यावर सोनेरी रंगाची लेस लावण्यात आली आहे. सध्या हिना खानचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.