चीनमध्ये 8 लाख डुकरांची कत्तल

सामना ऑनलाईन। बीजिंग

चीनमध्ये सध्या आफ्रिकन स्वाईन फीवरने कहर केला असून या आजाराची लागण झाल्याने आतापर्यंत 100 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चीनमध्ये तब्बल 9,16,000 डुकरांची कत्तल करण्यात आली आहे. जनतेच्या सुरक्षिततेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे चीन सरकारने म्हटले आहे.

सर्वात आधी ऑगस्टमध्ये चीनमधील अनेक भागात स्वाईन फीवरने डोके वर काढल्याचे समोर आले होते. त्यानंतर चीनमधील 24 प्रांतात व अनेक भागात या आजाराची लागण झाल्याचे समोर आले. पोर्क व्यवसायही संकटात सापडला आहे. जगातील सर्वात मोठा पोर्क बाजार चीनमध्ये असल्याने या बाजाराला मोठा फटका बसला आहे. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार माणसांपेक्षा अफ्रीकन स्वाईन फीवरचा सर्वात अधिक धोका डुकरांना असतो. यावर कुठलीही लस उपलब्ध नाही. यामुळे या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठीच डुकरांना ठार करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या महिन्यात तैवान सरकारने चीनला समज दिली होती. डुकरांना झालेल्या रोगाबद्दल माहिती दडवू नका असे तैवानने चीनला सांगितले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात चीनी डुकरांची मागणी घटेल यामुळे चीनने डुकरांना आजाराची लागण झाल्याचे वृत्त दडवले असा आरोपही तैवानने केला होता.

आपली प्रतिक्रिया द्या