‘अनाडी’ पंतप्रधान, हिना रब्बानी यांनी भर संसदेत केला इम्रान यांचा पाणउतारा

4888

हिंदुस्थानने जम्मू-कश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानचा जळफळाट सुरू आहे. संयुक्त राष्ट्रांसह मुस्लीम देशांनीही या मुद्द्यावर पाकिस्तानला साथ दिलेली नाही. हिंदुस्थानचा हा अंतर्गत मुद्दा असल्याचा निर्वाळा सर्वांनी दिला. त्यामुळे भजिती झालेल्या पाकिस्तानला आता स्वत:च्या देशातूनही विरोध होत आहे. विरोधी नेत्यांनी पंतप्रधान इम्रान खान यांनी घेरण्यास सुरुवात केली आहे. माजी परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी यांनी इम्रान खान यांचा उल्लेख ‘अनाडी’ पंतप्रधान असा केला आहे.

‘पंतप्रधान इम्रान खान यांच्यामुळे पाकिस्तानला मान झुकवावी लागली. अनाडी पंतप्रधानांना ट्रेनिग द्यायला हवी. त्यामुळे तुम्ही ट्रेनिग घेऊन या’, असे हिना रब्बानी बोलतात. हिना रब्बानी यांचा संसदेतील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. इम्रान खान आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री विदेशांमध्ये फिरून जम्मू-कश्मीर मुद्द्यावर विविध देशांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांच्याच देशातील माजी मंत्र्यांनी पानउतारा केल्याने जगभरात पाकिस्तानची छि-थू होत आहे.

हिना रब्बानी यांनी खार पाकिस्तान पिपुल्स पार्टीच्या नेत्या आहेत. परराष्ट्रमंत्रीपद त्यांनी यापूर्वी सांभाळलेले आहे. 2011 ते 2013 दरम्यान त्या परराष्ट्रमंत्री होत्या. वयाच्या 33 व्या वर्षी परराष्ट्रमंत्री बनण्याचा विक्रम त्यांच्या नावावर जमा झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या