बिग बॉसच्या सूत्रसंचलनासाठी सलमान घेणार इतक्या कोटींचे मानधन

सामना ऑनलाईन । मुंबई

बिग बॉस हा शो सध्या छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शो आहे. वाद विवाद, प्रेमप्रकरण, स्पर्धकांमधील चढाओढींसोबतच सलमान खानच्या सूत्रसंचलनामुळेही हा शो गाजत असतो. त्यामुळे बिग बॉस आणि सलमान असे एक समीकरणच बनले आहे. त्यामुळेच यंदाच्या सिझनसाठी सलमानला त्याच्या मानधनात घसघशीत वाढ मिळाली आहे.

आज तक या वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार चॅनलने सलमानला सूत्रसंचलनासाठी तब्बल 403 कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे. बिग बॉसचा 13 वा सीझन येऊ घातला आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुस्कता शिगेला पोहोचली आहे. या शोच्या प्रत्येकी एका शो साठी सलमानने 31कोटी रुपये मानधन घेतले आहे. या शो मध्ये एकूण 13 एपिसोड असतील. या 13 एपिसोडसाठी चॅनलने सलमानच्या होस्टिंगसाठी तब्बल 403 कोटी रुपये मोजले आहेत.

गेल्या वर्षीच्या सीझनसाठी चॅनले सलमानला एका एपिसोडसाठी 12 ते 14कोटी रुपये मानधान दिले होते. तर 11 व्या सीझनमध्ये एका एपिसोडसाठी 11कोटी रुपये देण्यात आले होते. 11 व्या सीझनसाठी 300 तर 12 व्या सीझनसाठी चॅनलने सलमानला 350 कोटी रुपये मानधन दिले होते.

आपली प्रतिक्रिया द्या