हिंदीमुळे संसदेतील चर्चेचा दर्जा घसरला! खासदार वायको यांचे विधान

85

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

सध्या संसदेत हिंदी भाषेत  भाषणे आणि चर्चा केली जात आहे. त्यामुळे संसदेतील चर्चेचा स्तर खालावला आहे. प्रत्येकजण हिंदीतून केवळ आरडाओरड करतात, असे मत तामीळनाडूतील मरूमलारची द्रविड मुन्नेत्र कळघम (एमडीएमके)चे सरचिटणीस व राज्यसभेतील खासदार वायको यांनी व्यक्त केल्याने खळबळ उडाली आहे.

हिंदी भाषेत कोणते साहित्य आहे? त्याची पाळेमुळे कुठेही नाहीत, मात्र त्याचा कोणताही विचार न करता संसदेत केवळ भाषणे झोडली जात असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्रास दिलेल्या मुलाखतीत वायको यांनी म्हटले आहे. तसेच संस्कृत ही साहित्यसंपन्न भाषा असली तरी ती आज मृत भाषा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हिंदीतच भाषण करतात असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पंडित जवाहरलाल नेहरू एक महान लोकशाहीवादी नेते होते. ते क्वचितच संसदेच्या सत्राला अनुपस्थित राहायचे, पण आज पंतप्रधान मोदी कधीतरीच संसदेच्या सत्रात सहभाग नोंदवत असे सांगत नेहरू हे पर्वत होते, तर मोदी केवळ पर्वताचा एक हिस्सा आहेत अशी तुलना केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या