शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देण्यासाठी शिवतीर्थावर उसळणार जनसागर!!

1329

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 17 नोव्हेंबर रोजी महानिर्वाण दिन. मराठी मनामनात अस्मितेची मशाल प्रज्वलित करणाऱया आणि अवघ्या देशात हिंदुत्वाचा वन्ही चेतवणाऱ्या आपल्या लाडक्या साहेबांना मानवंदना देण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा अलोट जनसागर उद्या शिवतीर्थावर स्मृतिस्थळी उसळणार आहे.

हेही वाचा- शिवसेनाप्रमुखांचा स्मृतिदिन, जनसागराच्या नियंत्रणासाठी शिवसेनेची यंत्रणा सज्ज

शिवसेनाप्रमुख म्हणजे धगधगते शिवतेजच. महाराष्ट्रासह अवघ्या देशभरात देव, देश आणि धर्माबद्दलचा स्वाभिमान जागृत करण्याचे महान कार्य शिवसेनाप्रमुखांनी केले. मराठी माणसांच्या धमन्यांमध्ये अस्मितेचे चैतन्य वाहू लागले ते शिवसेनाप्रमुखांमुळेच. असे हे शिवतेज 17 नोव्हेंबर 2012 रोजी अनंतात विलीन झाले. मात्र आजही ते शिवतेज कायम आहे, जाज्वल्य विचारांच्या रूपाने!

आपली प्रतिक्रिया द्या