हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गळा चिरुन हत्या

1937

उत्तर प्रदेशमध्ये हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांची गळा चिरुन हत्या करण्यात आली आहे. पैंगबरवरील विधानामुळे ते चर्चेत होते. लखनौ खुर्शीद बाग येथील हिंदू समाज पार्टी कार्यालयात चहा पिण्याच्या बहाण्याने हल्लेखोर आले होते. मिठाईच्या डब्यात चाकू आणि देशी कट्टा घेऊन आले होते. येथे हल्लेखोराने तिवारी यांच्यावर हल्ला करत त्यांची गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. नंतर तिवारी यांना ट्रामा केअर सेंटरमध्ये नेण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान ही हत्या कोणी केली याबद्दल अद्याप महिती मिळाली नाही. असे ‘आज तक” या वृत्त वाहीनीने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या