
कोरोनाकाळात अनेक जोडप्यांनी ऑनलाईन लग्न केले. खरंतर ऑनलाईन लग्न हा प्रकार कोरोनामुळेच प्रसिद्ध झाला. कोरोनाचे महत्व संपले असले तरी ऑनलाईन लग्नाला हजर राहणे हे अद्याप ही सुरू आहे. आता असेच एक ऑनलाईन लग्न लावलेल्या भटजींना चक्क चार लाखांची दक्षिणा मिळाली आहे.
मध्यप्रदेशमधील शिवनी येथे राहणाऱ्या भटजींनी अमेरीकेत राहणाऱ्या वधु-वरांचे लग्न लावले. 21 मे रोजी या वधू – वराचे भटजींनी व्हिडीओ कॉल द्वारे लग्न लावले. भटजींनी सांगितलेल्या सगळ्या विधींचे व संस्कारांचे वधू वराने पालन केले. हिंदू मंत्रोच्चार, शास्त्रोक्त पद्धतीने वधू वर लग्न बंधनात अडकले.
मुळचे शिवनी येथील रहिवासी सुनील उपाध्याय यांचा मुलगा देवांश उपाध्याय अमेरिकेत नोकरी करतो. तिथे नोकरी करत असताना देवांशची भेट पुण्यात राहणाऱ्या सुप्रियाशी झाली. काही काळ एकत्र घालवल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण कामाच्या व्यापामुळे दोघांनाही हिंदुस्थानात शक्य नसल्याने अमेरीकेतच लग्न करण्याचे ठरविले. लग्न जरी अमेरीकेत लावले तरी ते हिंदु संस्कृतीप्रमाणेच व्हावे अशी दोघांच्याही आई वडीलांची ईच्छा होती. त्यामुळे देवांशच्या वडिलांनी त्यांच्या ओळखीच्या भटजींना राजेँद्र पांडे यांची भेट घेऊन लग्नाची तारीख निश्चित केली. त्यानंतर 21 मे रोजी ऑनलाईन मंत्रोच्चाराने दोघांचे लग्न पार पडले. हा विवाह शास्त्रोक्त पद्धतीने लावल्याने रांजेद्र पांडे यांना 5100 अमेरीकन डॉलर एवढी भरगच्च दक्षिणा मिळाली. हिंदुस्थानी चलनानुसार एक लग्न लावल्याने तब्बल 4 लाख 20 हजार रूपयांची दक्षिणा भटजींना उपाध्याय परिवाराने अर्पण केली.