पाकिस्तानात मंदिराची तोडफोड, हिंदू शिक्षकाला मारहाण

1054

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एका हिंदू शिक्षकाला काही जणांनी मारहाण करत तेथील मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. सिंधमधील घोटकी प्रांतात ही घटना घडली असून याच्या निषेधार्थ हिंदू नागरिकांनी बंद पाळला होता. इस्लामी नेता मिआन याने व त्याच्या साथिदारांनी ही तोडफोड केल्याचे समजते.

सिंध प्रांतात अल्पसंख्याक हिंदूंवरील अत्याचार वाढत असून तेथील नागरिक कायम दहशतीखाली जगत आहेत. याआधी 2 सप्टेंबर रोजी देखील सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्यामधील कुंब या शहरात हिंदू मंदिरावर हल्ला करून त्याची तोडफोड करण्यात आली होती. तसेच त्या मंदिरातील पवित्र मूर्ती अणि धर्मग्रंथांचीही होळी करण्यात आली.

मंदिरांच्या सुरक्षेसाठी स्पेशल टास्क फोर्स स्थापन करा!

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील हिंदू मंदिरावरील हल्ल्याच्या या घटनेनंतर मंदिरांच्या सुरक्षेसाठी ‘स्पेशल टास्क फोर्स’ स्थापन करण्यात यावा, अशी मागणी पाकिस्तान हिंदू कौन्सिलचे सल्लागार कुमार हरदासांनी यांनी सरकारकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या