धर्मांतरण न केल्याने हिंदूंची संख्या कमी होतेय-किरेन रिजीजू

सामना ऑनलाईन,नवी दिल्ली

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी विधान केलंय की इतर धर्मातील लोकांचं हिंदू धर्मांतरण करत नसल्याने हिंदूंची लोकसंख्या कमी होत चालली आहे. हिंदुस्थानात अल्पसंख्यांकांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे. काँग्रेसने केलेल्या आरोपांना ट्विटवरून उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं आहे. काँग्रेसने आरोप केला होता की भाजपा अरूणाचल प्रदेशाला हिंदू राज्य बनवण्याचा प्रयत्न करत आहे.

काँग्रेसच्या आरोपांबाबत बोलताना रिजीजू म्हणाले की काँग्रेस बिनबुडाचे आरोप करत आहे, हिंदुस्थान हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. या देशात सगळ्या जाती पंथाचे लोकं आनंदाने आणि शांततेत राहत आहेत. स्वत:रिजीजू हे बौद्ध धर्माला मानणारे असून ते अरूणाचल प्रदेशातीलच रहिवासी आहेत.

रिजीजू यांच्या ट्विटरला उत्तर देताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलंय की रिजीजू यांनी हे विसरू नये की ते समस्त हिंदुस्थानाचे मंत्री आहेत,फक्त हिंदूंचे मंत्री नाहीत.

 

आपली प्रतिक्रिया द्या