Video – निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान – संभाजी भिडे

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांची जीभ आज पुन्हा घसरली. निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी सांगलीत विजयादशमीनिमित्त आयोजित दुर्गामाता दौडीच्या समारोपप्रसंगी केले. प्रभू रामचंद्र जसे विवेक हरवून सोन्याच्या हरणाच्या मागे गेले आणि सीतेचे अपहरण झाले तसे आताच्या राज्यकर्त्यांच्या अकला, बुद्धी, मेंदू विकारवश झाले आहेत, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. >

आपला कट्टर शत्रू असलेला चीन लोकसंख्येत आपल्या पुढे आहे. आपल्याला मात्र ते जमले नाही. पण निर्लज्जपणात मात्र आपण पहिल्या क्रमांकावर आहोत, असे संभाजी भिडे या वेळी म्हणाले.  ‘‘जगाच्या पाठीवर 187 राष्ट्रे आहेत. पण  प्रदीर्घ काळ परक्यांचा मार खात, त्यांचे दास्यत्व पत्करत, त्यांचे खरकटे खात, स्वाभिमानाची जाणीव नसलेला देश म्हणजे हिंदुस्थान,’’ असे संभाजी भिडे म्हणाले. कोरोना म्हणजे चीनने आपल्याला पालथे पाडण्यासाठी केलेली बदमाशी आहे असेही ते म्हणाले.