माहिराच्या ओठांबाबत बोलून हिंदुस्थानी भाऊ वादाच्या भोवऱ्यात अडकला, वाचा सविस्तर

2723

पाकड्यांना तुफानी शिव्या देत प्रसिद्ध झालेल्या विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊची बिग बॉसमध्ये एंट्री झाल्यापासून तो या शोमध्ये कोणाला शिव्या देतो हे पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे. आतापर्यंत त्याने शिव्या दिल्या नसल्याने तरी बिग बॉसच्या घरातील माहिरा शर्माच्या ओठांबाबत त्याने केलेल्या विधानांमुळे तो वादात अडकला आहे

बिग बॉसच्या पुढच्या भागाचा प्रोमो आला आहे ज्यामध्ये पारस आणि माहिरा यांच्या कडाक्याचं भांडण झाल्याचं दाखवलं आहे. या दोघांना बिग बॉसच्या घरातील तुरुंगात ठेवण्यात आल्याचं दाखवण्यात आलं असून माहिरा पारसवर आरोप करताना दिसत आहे. ‘तूच हिंदुस्थानी भाऊसोबत माझे ओठ मोठे आहेत, असे बोलत होतास, जरा नीट बोलत जा’ असं माहिराने पारसला ऐकवलं.

हिंदुस्थानी भाऊने माहिराला मोठ्या ओठांची पाल असं म्हटलं. तिला धडा शिकवायला हवा असंही तो म्हणाला. माहिरा चिडकी नंबर 1 असल्याचंही भाऊने म्हटलं आहे. त्याची ही विधानं ऐकून माहिराची आई भडकली असून तिने त्याच्यावर टीका केली आहे.हिंदुस्थानी भाऊने जेव्हा बिगबॉसच्या घरात एन्ट्री केली तेव्हा त्याने माहिराबाबत बोलताना ती माझ्या बहिणीसारखी आहे आहे असं तो म्हणाला होता असं माहिराच्या आईने म्हटलं आहे. मोठ्या प्लॅटफॉर्मवर भाव खाण्यासाठी हिंदुस्थानी भाऊने बहिणीची खिल्ली उडवणं योग्य आहे का ? असा प्रश्न माहिराच्या आईने विचारला. हिंदुस्थानी भाऊ नुसता कुचाळक्या करत असून तो ज्या गटात असतो तो गट दुसऱ्या गटाबद्दल वाईट बोलायला सुरु करतो असंही माहिराच्या आईने म्हटलं आहे

आपली प्रतिक्रिया द्या