हिंदुस्थानी भाऊची निर्माती एकता कपूरच्या विरोधात पोलिसांत तक्रार

1650

हिंदुस्थानी भाऊने निर्माती एकता कपूरच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. एकता कपूरने आल्ट बालाजीच्या एका वेबसीरीजमध्ये हिंदुस्थानी जवानांचा अपमान केला आहे, असा दावा हिंदुस्थानी भाऊने केला आहे. खार पोलीस स्थानकात त्याने ही तक्रार नोंदवली आहे.


View this post on Instagram

A post shared by Hindustani Bhau (@hindustanibhau) on

निर्माती एकता कपूर यांची आल्ट बालाजी हा ओटीटी प्लॅटफॉर्म आहे. या प्लॅटफॉर्मवर अडल्ट कंटेटचा भरणा आहे. त्यात XXX season 2 मध्ये एका एपिसोडमध्ये एक महिला जवानाची पत्नी दाखवली आहे. ही पत्नी आपल्या बॉयफ्रेंडसोबत सेक्स करते. सेक्स करताना तिने हिंदुस्थानी सैन्याचा पोषाख घातला आहे, यामुळे हिंदुस्थानी सैन्याचा अपमान झाला, म्हणून निर्माती एकता कपूर आणि शोभा कपूर यांनी माफी मागावी अशी मागणी हिंदुस्थानी भाऊने केली आहे.

हिंदुस्थानी भाऊने इन्स्टाग्रामवर लाईव्ह या प्रकरणाची माहिती दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या