‘बिग बॉस’ फेम हिंदुस्थानी भाऊला मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

‘बिग बॉस’ फेम विकास फाटक उर्फ हिंदुस्थानी भाऊ (Vikas Fhatak उर्फ ‘Hindustani Bhau) याला मुंबई पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतले आहे. मुंबईतील शिवाजी पार्कमधून त्याला ताब्यात घेण्यात आले. कोरोनाचे नियम तोडल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

हिंदुस्थानी भाऊ 12 वी बोर्डासह सर्व परीक्षा रद्द करण्याची मागणी करत आहे. यासाठी शिवाजी पार्कामध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती हिंदुस्थानी भाऊने शुक्रवारी दिली होती. त्याला रोखण्यासाठी मुंबई पोलीसही तयार होते. मात्र हिंदुस्थानी भाऊ पोलिसांना चकमा देत आणि कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन करत रुग्णवाहिकेमध्ये बसून शिवाजी पार्कात पोहोचला. पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी शिवाजी पार्कात धाव घेतली आणि हिंदुस्थानी भाऊला ताब्यात घेतले.

आपात्कालीन कारणांशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरण्यावर बंदी आहे. या प्रतिबंधाचे हिंदुस्थानी भाऊने उल्लंघन केले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच त्याला अटकही होऊ शकते.

प्रसिद्धी स्टंट

दरम्यान, झोन-5 चे डीसीपी प्रणय अशोक यांनी प्रसारमाध्यमांच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच हिंदुस्थानी भाऊने रुग्णवाहिकेने प्रवास केला असून अत्यावश्यक वैद्यकीय सेवेचा गैरवापर असल्याचे ते म्हणाले. तसेच हा निव्वळ प्रसिद्धी स्टंट होता, असेही प्रणय अशोक म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या