शिवसेनेचे हेमंत पाटील 2 लाख 77 हजार मतांनी विजयी

सामना प्रतिनिधी । हिंगोली

हिंगोली लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार तथा आमदार हेमंत पाटील हे विक्रमी 2 लाख 77 हजार 856 मतांनी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे हेमंत पाटील यांना 5 लाख 86 हजार 312 मते मिळाली असून काँग्रेसचे सुभाष वानखेडे यांना 3 लाख 8 हजार 456, तर वंचित बहुजनचे मोहन राठोड यांना 1 लाख 74 हजार 51 मते मिळाली आहेत.

शिवसेनेने अभूतपूर्व व विक्रमी मताधिक्य घेऊन काँग्रेसला धूळ चारली. शिवसेनेचे हेमंत पाटील हे 2 लाख 77 हजार 856 मतांनी विजयी झाले.