हिंगोलीचे खासदार उपोषकर्त्यांच्या तंबूत; जाणून घेतल्या व्यथा

1173

हिंगोली स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागण्यांसाठी बसलेल्या विविध संघटना, नागरिक व महिलांच्या उपोषणस्थळी भेट देऊन शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी अडचणी जाणून घेतल्या. तसेच संबंधीत विभागाला बोलून ह्या अडचणी सोडविल्या जातील, असे आश्वासन दिले.

महाराष्ट्र राज्य विनाअनुदानीत शिक्षण संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तसेच खुशालनगर भागातील महिलांनी देशी दारुचे दुकान बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. राष्ट्रीय अपंग विकास, महाराष्ट्र जिल्हा शाखा हिंगोलीच्या वतीने दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी उपोषण केले जात आहे. या सर्व उपोषणकर्त्यांची खासदार हेमंत पाटील व शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी भेट घेऊन चर्चा केली.

आपली प्रतिक्रिया द्या