बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

55

सामना ऑनलाईन । वसमत

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील माळवटा येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू झाला आहे. विशाल ठोंबरे (17) असं मृत तरूणाचे नाव असून माळवटा गावातील आसना नदी पात्रात तो रविवारी बैल धुण्यासाठी गेला होता. मयत विशाल ठोंबरे हा वसमत तालुक्यातील रांजोना येथील मुळ रहिवासी असुन तो माळवटा येथे मामाच्या घरी राहत होता. विशालच्या अकस्मात निधनामुळे माळवटा व रांझोना गावावर शोककळा पसरली आहे.

पोळ्यानिमित्त शेतकरी बैलांना अंघोळ घालून नंतर त्याची पुजा करतात. त्यामुळे विशाल देखील मामाचे बैल धुण्यासाठी नदीवर गेला होता. मात्र, दुर्देवाने पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या प्रकरणी वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या