
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी हिंजवडी येथील एक फोटो व्हायरल झाला होता. फुलांनी सजवलेल्या मंडपाच्या प्रवेशद्वारावर ‘घटस्फोट सोहळा’ असे लिहिलेले असल्याने हा फोटो चांगलाच गाजला होता. नक्की हा प्रकार काय आहे या विचाराने साऱयांनाच चिंतेत पाडले होते. अखेर ‘त्या’ व्हायरल फोटोमागचे सत्य समोर आले आहे.
हा घटस्फोट सोहळा खराखुरा नसून आगामी ‘मंगलाष्टक रिटर्न’ या चित्रपटाच्या शूटिंगमधील हा फोटो आहे. या चित्रपटात अंतर्गत होणाऱया या घटस्फोट सोहळ्याने सोशल मीडियावर चांगलाच हाहाकारच माजवला. योगेश भोसले दिग्दर्शित या चित्रपटात प्रसाद ओक, आनंद इंगळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.
आपली प्रतिक्रिया द्या