शिवकालीन ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची भिंत कोसळली

67

सामना प्रतिनिधी । चाकण

चाकणच्या ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची नव्याने बांधण्यात आलेली भिंत सततच्या पावसाने कोसळली आहे. मात्र किल्ल्याच्या शिवकाली काळातील भिंती आणि बुरूजाला अजूनही धक्का बसलेला नाही. त्यामुळे अलिकडच्या काळात बांधण्यात आलेल्या भिंतीचा पोकळपणा उघडकीस आला आहे.

शिवपुर्वकाळापासून या भुईकोट किल्ल्याची महती सर्वन्यात आहे. निसर्गाच्या सतत मिळणा-या धक्क्यांमुळे भुईकोट किल्ला अवशेष स्वरूपात होता. त्यामुळे शासनाच्या पुरातत्व व वस्तूसंग्राहालय संचालनालय यांनी या ऐतिहासिक स्मारकाचे जतन व दुरूस्तीच्या कामासाठी सुमारे एक कोटी खर्चाचे अंदाजपत्रक जाहीर केले होते. एक कोटी रूपये खर्चातून दगडाच्या तोडी वापरून किल्ल्याच्या भिंतींची काही ठिकाणी दुरूस्ती करण्यात आली होती. अवघ्या तिन-चार वर्षापुर्वीच झालेल्या नविन बांधकामाचा काही भाग शनिवारी सततच्या पावसामुळे कोसळला.

chakan-1

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संग्रामदुर्ग किल्याचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे यांनी अवघ्या मुठभर मावळ्यांच्या साथीने शाहीस्तेखानाशी १३ दिवस दिलेल्या लढतीची नोंद इतिहासकारांनी सुवर्ण अक्षरांनी केली आहे. भुईकोट किल्ल्याची डागडुजी व दुरूस्ती व्हावी यासाठी किल्लेदार फिरंगोजी नरसाळ स्मारक प्रतिष्ठान यांनी प्रयत्न केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या