ऐतिहासिक लाल महालाला नवी झळाळी मिळणार

128

सामना ऑनलाईन । पुणे

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली वास्तू म्हणजे पुण्याचा लाल महाल. याच लाल महालाचे पुणे महानगर पालिकेने नूतनीकरणाचं काम सुरू केले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर लाल महाल एका नवीन रुपात सर्वांना पाहायला मिळणार आहे.

नूतनीकरणाच्या दरम्यान लाल महालात अनेक बदल केले जाणार आहेत. पर्यटकांना सध्या महालाचा एक्त एकच मजला बघायला मिळतो. मात्र, नूतनीकरणानंतर महालाच्या वरील मजले देखील पर्यटकांना पाहता येतील. लाल महालाच्या नूतनीकरणामध्ये अंतर्गत सजावटीवर भर देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक ऐतिहासिक प्रसंग रेखाटलेलं प्रदर्शन लाल महालात मांडण्यात येणार आहे. अपेक्षा आहे की या वर्षाअखेरपर्यंत पर्यटकांना नवीन रुपातला लाल महाल बघायला मिळेल

दुर्मीळ चित्रं आणि छायाचित्रं, महाराष्ट्रातल्या प्रमुख किल्ल्यांच्या प्रतिकृती, प्रायोगिक कलेच्या सादरीकरणासाठी स्टेज अशा अनेकविध गोष्टी लाल महालात बघायला मिळतील.  नूतनीकरणानंतर महाराष्ट्राचं हे वैभव पुन्हा एकदा दिमाखाने आणि नव्या रूपात तमाम हिंदुस्थानाला बघायला मिळणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या