सिन्नर येथे शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन

388

सामना ऑनलाईन, सिन्नर

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुक्याचे शिवसेनेचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून शिवकालीन शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन सिन्नर सार्वजनिक वाचनालयात भरवण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन तालुक्याचे जेष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

कोल्हापूर येथील प्रसिद्ध इतिहासकार गिरीश लक्ष्मण जाधव यांनी संकलित केलेले शिवकालीन हत्यारे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध जिंकण्यासाठी कोणत्या प्रकारची शस्त्रे वापरली याची माहिती आजच्या तरुण पिढीला माहीत व्हावी यासाठी तालुक्याचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून सदरचे प्रदर्शन भरवले असल्याचे प्रतिपादन प्रकाशभाऊ वाजे यांनी केले.

याप्रसंगी इतिहासकार गिरीश जाधव यांनी या शस्त्रास्त्रांबद्दल उपस्थित नागरिकांना माहिती दिली. पाच दिवस हे प्रदर्शन सुरू राहणार असून हे प्रदर्शन पाहण्यासाठी वाचनालयात मोठी गर्दी होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या