हिटलरच्या घरात मानवाधिकार धडे

ऑस्ट्रियामधील हिटलरच्या घराचे रूपांतर आता पोलीस स्टेशनमध्ये करण्याची तयारी सुरू झाली आहे. या ठिकाणी पोलिसांना मानवाधिकाराचे धडे देण्यात येणार आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार, ही जागा ऑस्ट्रियामधील ब्रोनाऊ येथे आहे, जी जर्मनीच्या बॉर्डरपासून जवळ आहे.