हिंदुस्थानविरुद्ध लढण्यासाठी कश्मीरींना हत्यारे पुरवा, हिजबुलचे पाकिस्तानला आवाहन

2010

आमचे हिंदुस्थानविरोधात युद्ध सुरू आहे. त्यामुळे पाकिस्तानचे हे कर्तव्य आहे की पाकिस्तानने हिंदुस्थानविरुद्ध लढण्यासाठी कश्मीरींना शस्त्र पुरवावीत अशी गरळ हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या सय्यद सलाऊद्दीन याने ओकली आहे. त्याने पाकिस्तानला मदत करण्याचे आवाहन केले असून त्याचा एक व्हिडीओ जारी केला आहे.

‘गेल्या 72 वर्षांपासून हिंदुस्थान आपल्या भागात घुसखोरी करून बसला आहे. त्यांना तिथून हटविण्यासाठी आम्ही लढा देत आहोत. त्यासाठी आम्हाला मदत करणे हे पाकिस्तानचे कर्तव्यच आहे. त्यामुळे पाकिस्तानने कश्मीरमध्ये हिंदुस्थानी लष्कराशी लढा देणाऱ्यांना शस्त्र पुरवली पाहिजेत’, असे सल्लाऊद्दीन या व्हिडीओत सांगताना दिसत आहे.

जम्मू कश्मीरमधून केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यापासून दहशतवाद्यांच्या नांग्या आवळल्या गेल्या आहेत. जम्मू कश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात फौज फाटा तैनात असल्यामुळे दहशतवाद्यांना त्यांची डोकी वर काढता येत नाहीत. त्यामुळे दहशतवादी चवताळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या