हिंदुस्थानी महिलांचे ‘चक दे’ इंडिया!

47

हॉकी वर्ल्ड लीगच्या अंतिम फेरीत मजल

वेस्ट व्हॅनकुअर

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने कॅनडात खेळवण्यात येत असलेल्या हॉकी वर्ल्ड लीग – २ मध्ये बेलारूसवर ४-० अशी मात करीत अंतिम फेरीत मजल मारली. या विजयाने हिंदुस्थान जेतेपदाच्या शर्यतीतील दावेदार ठरला आहे. आता अंतिम लढतीत हिंदुस्थानी संघाला चिलीशी झुंजावे लागणार आहे. चिलीने उरुग्वेला २-१ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली आहे.

बेलारूसविरुद्धच्या उपांत्य लढतीत हिंदुस्थानी महिला सुरुवातीपासूनच आक्रमक खेळल्या. पूर्वार्धात १३ व्या मिनिटाला गुरजीत कौरने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर २० व्या मिनिटाला कर्णधार रितू राणीने पेनल्टी स्ट्रोकवर गोल करीत संघाला २-० असे आघाडीवर नेले होते. आजच्या विजयाने हिंदुस्थानी महिलांनी जून-जुलैत होणाऱ्या महिला हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.

आपली प्रतिक्रिया द्या