हिंदुस्थानचा ज्युनियर हॉकी संघ फायनलमध्ये

210

हिंदुस्थानच्या ज्युनियर हॉकी संघाने येथे बुधवारी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा 5-1 अशा फरकाने धुव्वा उडवला आणि सुल्तान जोहोर कप हॉकी स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता येत्या 18 ऑक्टोबरला साखळी फेरीतील अखेरच्या लढतीत हिंदुस्थानसमोर ग्रेट ब्रिटनचे आव्हान असणार आहे.

हिंदुस्थानी हॉकीपटूंच्या झंझावाती खेळासमोर ऑस्ट्रेलियन खेळाडूंची डाळ शिजली नाही. शिलानंद लाक्रा याने 26 व 29व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दिलप्रीत सिंगने 44व्या मिनिटाला, गुरसाहिबजीत सिंगने 48 व्या मिनिटाला आणि मनदीप मोरने 50 व्या मिनिटाला गोल करीत हिंदुस्थानचा महाविजय निश्चित केला.

आपली प्रतिक्रिया द्या