अशी करा झटपट शेव करी

23

सामना ऑनलाईन | मुंबई

साहित्य : एक कांदा उभा चिरलेला, ४ चमचे किसलेले खोबरे, ४ पाकळ्या लसूण, १ टोमॅटो, एकेक चमचा गोडा आणि गरम मसाला, १ चमचा लाल तिखट, कढीपत्ता, चवीनुसार मीठ, भावनगरी शेव.

कृती : सर्वप्रथम मध्यम आचेवर तापवलेल्या भांडय़ात किसलेले खोबरे सोनेरी रंग येईपर्यंत भाजा. त्यानंतर थोडय़ा तेलावर लसूण परतून घ्या.नंतर उभा चिरलेला कांदाही तेलावर खमंग भाजून घ्या. आता त्यामध्ये टोमॅटो, कांदा, नारळ, गोडा मसाला, गरम मसाला, लाल मिरची पूड यांची बारीक पेस्ट बनवा. मग कढईत तेल गरम करून त्याला हिंग,जिरे आणि लाल मिरची, कढीपत्त्याची फोडणी द्यावी. या फोडणीवर आधी वाटलेला मसाला तेल मसाल्यापासून वेगळे होईपर्यंत परतून शिजवून घ्यावा. त्यामध्ये पाणी, चवीपुरते मीठ घालून उकळवावे. रस्सा किंवा करी तयार झाली. एका वाटीत ही करी काढावी त्यावर शेव, बारीक चिरलेला कांदा घालून ब्रेड किंवा पावाबरोबर सर्व्ह करावी. शक्यतो जाड शेव वापरावी. कारण पातळ शेव करीमध्ये विरघळू शकते. सर्व्ह करण्यापूर्वी करीमध्ये ५ मिनिटे आधी शेव घालून ठेवा.

आपली प्रतिक्रिया द्या