चिरंजीवीच्या चित्रपटासाठी आखाती देशांतील काही कंपन्यांमध्ये सुट्टीची घोषणा

सामना ऑनलाईन,रियाध

दक्षिणेकडचा मेगास्टार चिरंजीवी बऱ्याच दिवसानंतर मोठ्या पडद्यावर कमबॅक करतोय. बुधवारी त्याचा खिलाडी नं.१५० चित्रपट जगभरात रिलीज होणार आहे. हा सिनेमा पाहता यावा यासाठी आखाती देशातील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आणि खाजगी कंपन्यांनी सुट्टी घोषित केली आहे.

चिरंजीवीचा चित्रपट संयुक्त अरब अमिरातीमध्ये २० थिएटरमध्ये झळकणार आहे. आणि या सगळ्या शो ची तिकीटं आधीच बुक झाली आहे. रियाधमधील एका बांधकाम कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने म्हटलंय की १० वर्षानंतर आमचा हिरो कमबॅक करतोय. आणि या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. या चित्रपटासाठी मस्कतमधील दोन कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टीच घोषित करून टाकली आहे. चिरंजीवीचा १५० वा चित्रपट प्रदर्शित असल्याने आम्ही ही सुट्टी जाहीर करत असल्याचं या कंपनीतर्फे सांगण्यात आलंय.

बाहरीन, ओमान, सौदी अरेबिया, कतार आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये जवळपास ४ लाख तेलगू भाषिक आहेत. ज्यातले बहुसंख्य मजूर आहेत तर काही प्रमाणात चांगल्या पदावर कामावर आहेत.