शिल्पा शेट्टीचे चुंबन घेणारा ‘तो’ परत येतोय….

24

सामना ऑनलाईन । मुंबई

अभिनेत्री शिल्पा शेट्टीला जाहीर कार्यक्रमात स्टेजवर चुंबन घेतल्याने चर्चेत आलेला हॉलिवूड कलाकार रिचर्ड गॅरे ३० वर्षानंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतोय.

रिचर्ड ‘मदरफादरसन’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पुनरागमन करणार आहे. या कार्यक्रमात तो अमेरिकन मीडियातील व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. बीबीसी स्टुडिओ ड्रामा लंडन या कार्यक्रमाची निर्मती करणार आहे.

टॉम स्मिथ यांचे लेखन असलेल्या या कार्यक्रमातून मी पुनरागमन करतोय याचा मला खूप आनंद होत असल्याचे गॅरेने सांगितले. मदरफादर सन हा एक व्यवसायीक पिता (गॅरे) आणि त्याची पत्नी माजी पत्नी ( हेलन)  आणि त्यांचा मुलगा कॅडेन ( हावल) यांची गोष्ट आहे. एकूण आठ भागांमध्ये ही गोष्ट प्रसारित होणार आहे.

जयपूरमध्ये १५ एप्रिल २००७ या दिवशी झालेल्या एड्स जनजागृती कार्यक्रमात गॅरीने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे स्टेजवर चुंबन घेतले होते. गॅरीच्या या चुंबनाचे जोरदार पडसाद उमटले. लोकांच्या तीव्र विरोधामुळे त्याने माफी मागितली. मात्र  या प्रकरणात त्याच्या विरोधात खटलाही दाखल करण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या