…आणि विल स्मिथने देवापुढे हात जोडले!

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हॉलीवूडचा सुपरस्टार विल स्मिथ याचे हिंंदुस्थान प्रेम जगजाहीर आहे. हेच प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याने देवापुढे गुडघे टेकलेला एक फोटो सोशल साईटवर शेअर केला आहे. त्याच्या या फोटोला लाखो लाईक्स मिळाले आहेत.

काही दिवसांपू्र्वी विल हिंदुस्थानच्या दौऱ्यावर आला होता. यावेळी हरिद्वारसह अनेक धार्मिक ठिकाणांना त्याने भेट दिली. त्या प्रसंगांचे फोटो त्याने सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटो व्हायरल झाले आहेत. यातील एका फोटोत विल देवापुढे गुडघे टेकून प्रार्थना करत असल्याचे दिसत आहे. तर काही फोटोत विल चक्क देवाच्या आरतीत तल्लीन झाल्याचंही दिसत आहे. या फोटोखाली त्याने काही ओळी पोस्ट केल्या आहेत. माझी आजी म्हणायची परमेश्वर अनुभवातूनच शिकवत असतो. हिंदुस्थानच्या यात्रेत मला याचा अनुभव आला. येथील लोकं व नैसर्गिक सौंदर्य बघून मला जगातील सत्याचं कोडंच उलगडलं आहे, असं विलने म्हटलं आहे.

विल याला हिंदुस्थानबद्दल अपार प्रेम व आदर आहे. येथील वैविध्यतेतील एकता बघून तो अचंबित झाला आहे. एका बॉलीवूड चित्रपटाच्या शूटींगदरम्यान त्याने रिक्षाने प्रवास केला होता. त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर टाकला आहे. दिग्दर्शक व निर्माता करन जोहरने टि्वटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात विल राधा तेरी चुनरी या गाण्यावर नाचताना दिसत आहे. या गाण्यात त्याच्याबरोबर टायगर श्रॉफ, अन्यन्या पांडे, तार सुतारिया व पुनित मल्होत्राही थिरकत असल्याचे दिसत आहे. विल स्टुडंट ऑफ ईयर-2 मध्ये झळकणार असल्याची चर्चा आहे. पण यात तो कोणत्या भूमिकेत दिसेल हे मात्र अद्याप समजलेले नाही.

आपली प्रतिक्रिया द्या