केरळच्या पूरग्रस्तांना घरासाठी सवलतीत कर्ज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

केरळच्या पूरग्रस्तांना घरदुरुस्ती तसेच नवे घर बांधण्यासाठी सवलतीच्या दराने कर्जपुरवठा करण्याचा निर्णय स्टेट बँक ऑफ इंडिया, एलआयसी हौसिंग फायनान्स आणि मुथूट फायनान्सने जाहीर केला.

स्टेट बँकतर्फे पूरग्रस्तांना विशेष मुदतीचे कर्ज दिले जाणार असून त्याचा व्याजदर 8.45 टक्के इतका असेल. पूरग्रस्तांना 10 लाख रुपयांचे कर्ज सवलतीच्या दराने देण्याची घोषणा केली आहे. बँक घरकर्जावर प्रोसेसिंग फी आकारणार नाही. एलआयसी हौसिंग फायनान्सने 15 लाखांपर्यत 8.5 टक्के दराने घरासाठी कर्ज देण्याची योजना जाहीर केली आहे.

summary- home at concession rates for kerala flood victims