आरोपींना घरचे जेवण देण्यास न्यायालयाचा नकार

21

सामना प्रतिनिधी । मुंबई

भायखळा तुरुंगातील महिला कैदी मंजुळा शेटय़े हिची हत्या जेवणातील अंडा-पावामुळे झाली असतानाच दुसरीकडे या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना घरचे जेवण देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. आरोपी या महिला असून त्यांना लहान मुले आहेत. त्यांना मुलांना भेटण्याची परवानगी द्यावी या अर्जावर शुक्रवारी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

भायखळा तुरुंगातील वॉर्डन मंजुळाचा २४ जून रोजी मृत्यू झाला. जेलर मनीषा पोखरकरसह सर्व आरोपींना ७ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींना कोठडीमध्ये घरचे जेवण देण्याची परवानगी द्यावी असा वकील पंकज बाफना यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. तर शीतल शेगावकर वगळता इतर आरोपींना मुले आहेत. त्यांना भेटण्याची परवानगी देण्याबाबत शुक्रवारी सुनावणी होणार आहे.

दंगलीचा गुन्हाही क्राइम ब्रँचकडे

मंजुळा शेटय़े हिच्या हत्येचा गुन्हा नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पुढील तपासासाठी तो क्राइम ब्रँचकडे वर्ग करण्यात आला. मंजुळाच्या हत्येनंतर तुरुंगात दंगल भडकली. यासंदर्भात इंद्राणी मुखर्जी हिच्यासह अन्य महिला कैद्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या गुह्याचा तपासही आता क्राइम ब्रँचकडे देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या