कुणाला शहरी नक्षलवादी म्हणता येणार नाही- गृहमंत्री अनिल देशमुख

749

भाजप सरकारच्या भूमिकेविरोधात वेगळे मत मांडले म्हणून कुणाला शहरी नक्षलवादी म्हणणे योग्य ठरणार नाही. भीमा-कोरेगाव प्रकरणात शहरी नक्षलवाद्यांचा सहभाग होता का याची अन्य मुद्यांप्रमाणे चौकशी सुरू आहे. चौकशीअंती नेमकी वस्तुस्थिती समोर येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी बुधवारी स्पष्ट केले.

विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना अनिल देशमुख म्हणाले, कोरेगाव-भीमाप्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांची मी लवकरच बैठक घेतल्यानंतरच सरकारची भूमिका मांडली जाईल. भीमा-कोरेगाव प्रकरणातील गुन्हे मागे घेण्यासंदर्भात आपण कोणतंही विधान माध्यमांमध्ये केलेलं नाही. मात्र काही विशिष्ट माध्यमांनी काही विधानं माझ्या तोंडी घातली, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं.

महेकवरील कारवाईचा फेरविचार करणार

गेट वे येथे फ्री कश्मीरचा फलक झळकवल्याप्रकरणी महेक प्रभू या तरुणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना अनिल देशमुख म्हणाले, जेएनयूमधील हिंसाचाराविरोधात गेट के ऑफ इंडियावर निदर्शने करण्यात आली. त्यावेळी एका तरुणीच्या हातात प्री कश्मीर असा फलक असल्यानं तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पत्रकारांनी विचारलं असता देशमुख यांनी स्पष्ट केलं की, त्या तरुणीनं पोलिसांना दिलेल्या जबानीतून तिचा उद्देश राष्ट्रद्रोहाचा नव्हता असं प्राथमिकदृष्टय़ा दिसतं. कश्मीरमध्ये अजूनही मोबाईल, इंटरनेट सेवा सुरळीत नाही. नेत्यांना नजरकैदेत ठेवलं आहे. या परिस्थितीतून कश्मीरमुकत कराव या भूमिकेतून तिनं प्री कश्मीरचा फलक हाती धरला होता, असं तिचं म्हणणे आहे. याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सर्व माहिती घेऊन तिच्यावरील कारवाई संदर्भात फेरविचार केला जाईल, असे देशमुख यांनी स्पष्ट केलं.

आपली प्रतिक्रिया द्या